35.6% had no ration cards at all 43.2% had orange ration cards which indicated that a majority of the workers were above BPL levels, yet earned below Rs.one lakh annually., 16.4.% had yellow cards, indicating their BPL status.2.4% had white cards, i.e they earned above one lakh of rupees annually. 17.2% saved in banks. Bhishi is a popular means of savings for the respondents and Other means of savings are- saving at home, post office and through SHGs.
प्रभात ट्रस्ट ही सेवाभावी संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम 1950 अंतर्गत नोंदणीकृत नवी मुंबई मधील सामाजिक संस्था आहे. 2011 पासुन या संस्थेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित वंचित घटकांसाठी अभिनव प्रयोग राबविले जातात.
नेत्र सुरक्षा अभियान
याचाच एक भाग म्हणून संस्थेच्या माध्यमातून कामगारांसाठी नेत्र सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात येते यामध्ये डोळ्यांना आघात होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर आघातानंतर करावयाचे प्रथमोपचार याची माहिती कामगारांना दिली जाते त्याचबरोबर नेत्र तपासणी करून योग्य चष्म्याचा नंबर देणे तसेच आवश्यक असल्यास औषध उपचार उपलब्ध करून देणे व शस्त्रक्रिया ची गरज असल्यास शस्त्रक्रिया करणे अशाप्रकारे मोलमजुरी करणाऱ्या कामगारांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न प्रभात चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे.
कामगारांसाठी यशस्वी ठरलेले नेत्र सुरक्षा अभियान पुढे समाजातील विविध घटकांसाठी राबविण्यात आले यामध्ये सलून चा व्यवसाय करणारे,गॅरेजमध्ये कार्यरत असणारे,वेल्डिंग व्यवसाय करणारे इतकेच नव्हे तर अगदी हाउसिंग सोसायटी तसेच पत्रकार बंधूंसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले यामध्ये मोबाईल कॉम्पुटर वापरताना डोळ्यांची घ्यावयाची काळजी तसेच डोळ्यांच्या निगडित असणाऱ्या प्रश्नांचे समाधान करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अवयवदान अभियान
प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट माध्यमातून अवयवदान चळवळीसाठी ZTCC, मुंबई च्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबविले जातात. यामध्ये जनजागृती करण्यासाठी शाळा महाविद्यालय,ज्येष्ठ नागरिक, संघ गृहनिर्माण संस्था इत्यादी ठिकाणी अवयवदान जनजागृती व्याख्यानांचे आयोजन करण्यात तसेच अवयव दानाचे संकल्पपत्र नोंदणी करून घेतले जातात. अवयवदान चळवळीमध्ये कार्यरत असताना मुंबई ते गोवा पदयात्रेमध्ये सहभागी होऊन आपला खारीचा वाटा उचललेला आहे.
समाजामध्ये अवयवदानाबाबत असणाऱ्या अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो सर्वसामान्यतः अवयवदान चळवळीमध्ये दुर्लक्षित असणाऱ्या अवयवदात्यांना सन्मानित करण्याचा अनोखा उपक्रम ही अवयवदाता सन्मान च्या माध्यमातून संस्थेकडून यशस्वीरीत्या करण्यात येत आहे.
यामध्ये मृत्यू पश्चात अवयवदानाचा संकल्प पूर्ण करणाऱ्या त्यांच्या आप्तेष्टांना अवयवदाता सन्मान देऊन ट्रस्टच्या माध्यमातून सन्मानित करण्यात येते.
अवयवदानाचा संदेश देण्यासाठी अवयवदाता दूत अर्थात आर्गन डोनर मेसेंजर या संकल्पनेद्वारे अवयवदान चळवळीमध्ये जोडल्या जाणाऱ्या स्वयंसेवकांना योग्य प्रशिक्षण देऊन यांच्याकडून समाजामध्ये अवयव दान जनजागृती करण्यात येते.
व्याख्यानमाला
प्रा. भास्करराव थोरात यांच्या संकल्पनेतील आदर्श तरुण घडविण्यासाठी युवा शक्तीचा वापर हा समाज प्रबोधनासाठी व्हावा या उदात्त हेतूने नवी मुंबईमध्ये व्याख्यानमालेची सुरवात सन 2013 सालापासून करण्यात आली.
आयुष्याचं गुरुकुल या शृंखलेत आत्तापर्यंत सहा पुष्प यशस्वीरित्या गुंफण्यात आली आहेत. यासाठी अनुक्रमे प्रा. प्रवीण दवणे,पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, मा. रामदास फुटाणे, मा. अविनाश धर्माधिकारी, प्रा. नामदेवराव जाधव यांनी आपले विचार प्रकट केले आहेत.
त्याचबरोबर समाजामध्ये जनजागृती घडावी यासाठी समाज माध्यमांचा वापर करणे हि काळाची गरज आहे हे जाणून नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून प्रभात ट्रस्ट या यूट्यूब चॅनल च्या माध्यमातून माध्यमातून प्रेरणा देणारे विविध व्हिडिओज प्रसारित केले आहेत. त्यापासून लाखो तरुणांनी प्रेरणा घेतल्याचे पाहावयास मिळते.
आदर्श ग्रंथपाल पुरस्कार
ग्रंथपाल असणाऱ्या थोरात सरांच्या स्मृती जतन करण्यासाठी प्रा. बी. आर. थोरात राज्यस्तरीय आदर्श ग्रंथपाल पुरस्कार सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये रोख स्वरूपात ग्रंथालय चळवळीत बहुमूल्य योगदान देणाऱ्या ग्रंथपालांना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येतो. यामुळे निश्चितच ग्रंथालय चळवळीस बळ मिळेल अशी अपेक्षा आहे.
अटल कट्टा
कविमनाचे माजी पंतप्रधान मा.अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अटल कट्टा नावाचे कवितेचे व्यासपीठ निर्माण करून तमाम नवी मुंबईतील साहित्यप्रेमींच्या वतीने त्यांना आगळी-वेगळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आश्रमशाळांमध्ये मदतीचा हात
मोखाडा येथील अतिदुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये आवश्यक साधन सामग्री, शैक्षणिक साहित्य, स्पीकर सिस्टम, दैनंदिन वापरातील प्रथम उपचारासाठी आवश्यक औषंधाचें तेथील शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देऊन वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
वैद्यकीय शिबिरांच्या
वैद्यकीय शिबिरांच्या आयोजनाबरोबरच शाळा तसेच महाविद्यालय यामध्ये आरोग्य विषयक जनजागृतीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम उपक्रम संस्थेच्या वतीने राबविले जातात.
प्रकाश रथ
समाजातील उपेक्षित वंचितांना नेत्र सेवा घडावी या उदात्त हेतूने प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट नेहमीच कार्यतत्पर असते. परंतु ज्या ठिकाणी आपण नेत्रसेवा देतो अशा ठिकाणी नेत्र तपासणीस आवश्यक उपकरणे त्यास आवश्यक विद्युत पुरवठा उपलब्ध होत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या अडचणीवर मात करण्यासाठी डॉ. प्रशांत थोरात यांच्या संकल्पनेतून डोळ्यांच्या फिरत्या दवाखान्याची संकल्पना साकार करण्यात आलेली आहे.
या डोळ्यांच्या फिरत्या दवाखान्यांमध्ये सौरऊर्जेचा वापर सर्वप्रथम करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर समाजातील तळागाळातील लोकांना व्हावा या उद्देशाने या दवाखान्यांमध्ये टेलिमेडिसीन चाही अंतर्भाव करण्यात आलेला आहे. अशाप्रकारे अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह कोणत्याही नाक्यावर, वाड्या-वस्त्यांवर, आदिवासी पाड्यांवर, शेतात काम करणाऱ्याना याचा लाभ व्हावा तसेच नेत्र सुरक्षा अभियान हे लोकांच्या दारापर्यंत घेऊन जाण्याचं लक्ष्य प्रभात चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे. हा उपक्रम उभ्या महाराष्ट्राने समाजसेवेची ज्याच्याकडून प्रेरणा घेतली अशा आदरणीय डॉ. प्रकाश आमटे सर यांना समर्पित करण्यात आला असून या संकल्पनेला प्रकाश रथ असे नाव देण्यात आले आहे.