• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

सरप्राईज वाढदिवस

सर्वसाधारणतः वाढदिवस असणाऱ्याला सरप्राईज दिले जाते…परंतु या ठिकाणी निमंत्रितच सरप्राईज झाले…

वाढदिवस तुमचा… आनंद सर्वांचा… अर्थात सामाजिक जाणवेतून साजरा केलेला वाढदिवस… प्रभातचा कामगार नाक्यांवर वाढदिवस साजरे करून इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधण्याचा प्रयत्न निरंतर सुरू आहे.. या शृंखलेत आज नाका कामगार व कचरा वेचक महिला यांच्यासाठी आता थांबायचं नाय.. या चित्रपटाचा विशेष शो कोपरखैरणे बालाजी थिएटर येथे आयोजित करण्यात आला..यामध्ये कित्येक कामगार आज पहिल्यांदाच चित्रपटगृहात येत होते..चित्रपट म्हणजे मनोरंजन पण जेव्हा मनोरंजनातून समाज प्रबोधन होते तेव्हा ते अगदी खोलवर रुजते…

बृहन्मुंबई महापालिकेचे निवृत्त सहाय्यक आयुक्त विजयकुमार शिरूरकर यांनी कामगारांना शिक्षण मिळावे यासाठीच्या सत्य घटनेवरती हा चित्रपट आधारित आहे…कामगारांचा संघर्ष जीवनाला एक नवी दिशा व काम करण्याला नवी उमेद देणारा आहे…

भारत पाक युद्धात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करून या चित्रपटाची सुरुवात झाली आणि शेवट उदयकुमार शिरूरकर, अप्सरा व पव्या (किरण खोजे, प्रवीण डाळिंबकर) या कलाकारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत झाला.. आपलीच भूमिका पडद्यावर साकारणारे हे कलावंत पाहून कामगारांच्या चेहऱ्यावरील आनंद कॅमेऱ्यात कैद करणेही शक्य नव्हते..

चित्रपट म्हणजे कोल्ड्रिंक व पॉपकॉन हे समीकरण झाले आहे पण आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची परंपरा जपत प्रभातने मेळघाटातील पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे यांच्या शेती प्रयोगातून तयार झालेले कोहिनूर हे फळ प्रत्येक उपस्थितांना देऊन एक नवा आदर्श तयार केला..

प्रभात टीमने हा उपक्रम राबवत असतान आज माझा वाढदिवस आहे हे निमंत्रितांसाठी सरप्राईज ठेवले होते… त्यामुळेच हा सरप्राईज वाढदिवस कायम स्मरणात राहील…

सामाजिक बांधिलकी जपत आपले वाढदिवस साजरे करण्यासाठी आपण प्रभातला *9869432224 संपर्क करावा…

डॉ.प्रशांत भा.थोरात नेत्ररोग तज्ञ