• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

? जबाबदाऱ्यांच्या छायेत उजळलेलं शिक्षण ?

Navdurga

तुफानातली 7 वी पणती

घरामध्ये एकामागून एक संकटं कोसळली की माणूस खचतो, पण काहीजण मात्र त्या संकटांना सामोरं जात उभं राहण्याची ताकद कमावतात. अशीच आहे आपली
ती चार भावंडांतली एक. मोठा भाऊ आणि बहीण लग्न करून स्वतःच्या संसारात रमले. घरी उरली फक्त ती आणि धाकटा भाऊ. वडील सतत आजारी, आई गेल्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या तिच्या खांद्यावर आल्या. आवड असूनही तिला शिक्षण सोडावं लागलं.

थोडं थोडं करून घर चालवायचं म्हणून तिने खत प्रकल्पावर काम सुरू केलं. थोडं समाधान मिळतंय असं वाटत असतानाच भावाची पत्नी मुलाला सोडून निघून गेली. आता वडिलांसोबत भाच्याची जबाबदारीही तिच्या खांद्यावर येऊन पडली.

म्हणतात ना संकटांतूनच नवे दरवाजे उघडतात अगदी तसेच तिला बचत गटात सहभागी होण्याची संधी मिळाली. बचत गटात केवळ पैशांची बचत नाही, तर आयुष्य कसं उभारायचं याचं ज्ञान मिळालं. आशाताईंनी विचारलं – “शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे का? अभ्यास वर्गाला येणार का?” तो प्रश्न तिच्या अंतर्मनाला भिडला आणि नवा प्रवास सुरू झाला…
दहावीसाठी च्या अभ्यास वर्गात तिला नवीन उमेदीचा किरण दिसला. अजित खताळ सरांसारखे शिक्षक शिकवताना केवळ धडे सांगत नव्हते, तर जीवनातील शिक्षणाचं महत्त्वही समजावत होते. अपुरी राहिलेली स्वप्नं पुन्हा जागी झाली, मनामध्ये नवं बळ निर्माण झालं. आज ती निर्धाराने म्हणते आता थांबायचं नाय..

शिक्षणाच्या वाटेवर परतलेल्या या दुर्गेला आपण दिलेल्या मदतीचा हात नक्कीच मोठा आधार ठरेल अधिक माहितीसाठी प्रभातला 9869432224 या क्रमांकावर संपर्क करावा..?