• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

तुला बापलेकांचा

(पिता पुत्रांचा एक अनोखा वाढदिवस…)

नवी मुंबई मध्ये कोणत्याही कार्यक्रमात रांगोळी पाहिली की नाव येते श्रीहरींचे… अर्थात श्री. हरिविजय उर्फ श्रीहरी पवळे सरांचे एखाद्या क्षेत्रावर इतका खोलवर ठसा रुजवणारे व्यक्तिमत्व इतर क्षेत्रातही काही कमी नाही हे विशेष.. कलाशिक्षक, नाट्य लेखक, कलाकार, दिग्दर्शक अशा विविध भूमिकेत श्रीहरी पवळे सर सर्वांनाच ज्ञात आहेत..

आज १ जून या शासकीय तारखेप्रमाणे श्रीहरी पवळे सर सेवानिवृत्त झाले..कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा कृतज्ञता सन्मान प्रभात च्या माध्यमातून करण्याचे नियोजित होते.. परंतु हा सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांनी एक अट घातली.. ती म्हणजे माझी तुला करण्यापूर्वी माझ्या वडिलांचीही तुला झाली पाहिजे.. ही अट ऐकून
आम्हाला अतिशय आनंद झाला.. कारण आपल्या पित्यांवर कसे प्रेम असावे हे श्रीहरी पवळे सर यांच्या या अटीमुळे आम्हाला उमगले. योगायोग म्हणजे त्यांचे वडील यांचा वाढदिवस ही १ जूनच…

हा दुग्ध शर्करा योग ओळखून आज श्रीहरी पवळे सर यांची कला साहित्याने तुला करून त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली…यामध्ये चित्रकलेसाठीचे वॉटर कलर, ब्रश संच, वह्या व रांगोळी यांचा समावेश होता.. हे साहित्य मोखाडा येथील आदिवासी आश्रम शाळांना वितरित करण्यात येणार आहे…

त्याचबरोबर श्रीहरी पवळे सरांचे वडील ह.भ.प. अप्पासाहेब गणपतराव पवळे यांचीही कडधान्याने तुला करण्यात आली. या कडधान्याचे वितरण नाका कामगारांसाठी करण्यात येणार आहे..

श्रीहरी यांनी सन्मानाचा स्वीकार करून फक्त हे कला साहित्य आश्रम शाळांना न देता स्वतः या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कलेचे धडे देण्याचा मनोदय व्यक्त केला…

या पिता- पुत्राची तुला एकाच दिवशी करून प्रभातने नव्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे..

leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *