• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

फादर्स डे…उमगूया बाप रं…

फादर्स डे

फादर्स डे…उमगूया बाप रं…

फादर्स डेच्या अनुषंगाने प्रभातच्या काही घडामोडी विचार करायला भाग पाडतात..

कलाशिक्षक श्रीहरी पवळे यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या सन्मानासाठी तुला करताना त्यांनी आपली तुला करण्यापूर्वी आपल्या पित्याची तुला करावी अशी अट घातली व प्रभात ने बापलेकांचा तुला एकाच वेळी करून वाढदिवसाचा दुग्ध शर्करा योग साधला..

स्वतःचे शिक्षण कमी असतानाही बी.एस.टी मध्ये ड्रायव्हर म्हणून निवृत्त झालेले जनार्दन निकम (भाऊ) यांनी मुलांना शिक्षक, इंजिनियर करून त्यांच्यामध्ये शिक्षणाचे महत्त्व रुजविले… त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त मुलांनी त्यांची कचरावेचक महिलांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्याने तुला केली…

आषाढी वारी सेवेतील सहकारी डॉ.वीरेंद्र परकाळे यांनी वाढदिवसानिमित्त फोन केल्यावर त्याच दिवशी वडिलांची पुण्यतिथी असल्याचे लक्षात आणून दिले.. आपला वाढदिवस नको वडिलांसाठी कार्यांजली करूयात असे सुचविले.. कै.तुकाराम परकाळे यांच्या स्मरणार्थ त्याच दिवशी नाका कामगारांसाठी अन्नधान्य वितरित करण्यात आले..

यावर्षी प्रभाच्या व्याख्यानमालेमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आण आम्ही या विषयावरील व्याख्यान अशिक्षित वडिलांचेही जीवनातील स्थान अधोरेखित करणारे होते…

आज तुझ्या ज्ञानाचा,पैशांचा, पदाचा समाजातील किती उपेक्षित घटकांना उपयोग झाला असे नियमित विचारणारे कै. प्रा.बी. आर. थोरात यांच्या प्रेरणेच्या शिदोरीतूनच आज प्रभातचे काम सुरू आहे..

या सर्व प्रसंगातून एकच बाब अधोरेखित होते ती म्हणजे यातील मुलांना आपला बाप काही प्रमाणात तरी उमगला आहे… फरक एकच आहे काहींना जिवंत असताना तर काहींना गेल्यानंतर…

यानिमित्ताने ज्या भाग्यवंतांचे वडील अजून जिवंत आहेत त्यांना विनंती आहे की वडिलांशी मनमोकळा संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन घ्यावे कारण अवघड आहे गड्या उमगाया बाप रं…
वडिलांना नक्की काय अपेक्षित आहे..? हे आपल्याला एकदाका उमगले की मग रोजच फादर्स डे होऊ शकतो…

डॉ.प्रशांत भा.थोरात
नेत्ररोग तज्ञ
प्रभात ट्रस्ट, नवी मुंबई
9769432224

leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *