शिक्षणाच्या वाटेवर आता थांबायचं नाय म्हणून परतलेल्या नवदुर्गा…
एकविसाव्या शतकात, विज्ञानयुगात जगताना देखील स्त्रीला पती गमावल्यावर आयुष्य संपल्यासारखं वाटतं. आत्मविश्वास, जगण्याची उमेद सगळं हरपून जातं. समाजाची भीती तिच्या पायांना बेड्या घालते.
ती 36 वर्षाची असतानाच
पती अचानक वयाच्या 45 व्या वर्षीच गेले. दोन मुलं एकाने शिक्षण सोडलं, दुसरा शेवटच्या वर्षाला. घरात दुःख, कर्जाचा डोंगर आणि रोजच्या जगण्याचा प्रश्न..
ती स्वतःला घरातच कोंडून बसली होती. बाहेर जायची तिची हिंमत होत नव्हती. “लोक काय म्हणतील?” हा प्रश्न तिला रोज छळत होता. तेव्हा संस्थेने तिचा हात धरला. तिला विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करायला प्रवृत्त केले. “लोक काहीही बोलोत, मला माझ्या मुलांसाठी उभं राहायचं आहे.” या निश्चयानं ती घराबाहेर पडली. काम करून घरखर्च सुरळीत होऊ लागला. तिच्या डोळ्यात पुन्हा आत्मविश्वास दिसू लागला. पण मनात आपलं शिक्षण अपूर्ण असल्याची खंत मात्र सतावत होती. परिस्थितीमुळे दहावीची परीक्षा जे देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी प्रभातने सुरू केलेल्या अभ्यास वर्गाबद्दलची माहिती तिला प्रकल्प समन्वयक आशाताईंकडून मिळाली आणि तिनं ठाम निश्चय केलाय आता थांबायचं नाय..!
शिक्षणाच्या वाटेवर परतलेल्या या दुर्गांना आपल्या मदतीचा हात खूप मोलाची साथ देणारा ठरेल..
