• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

तुफानातल्या पणत्या…२

Navdurga

शिक्षणाच्या वाटेवर आता थांबायचं नाय म्हणून परतलेल्या नवदुर्गा…

नवी मुंबईशहराच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या तिचा हम दो हमारे दो दोन असा छोटासा संसार.. तीला लहानपणापासूनच विविध कला शिकण्याची आवड होती म्हणून हाताला येईल ती कला आत्मसात करून तिने प्रत्यक्षात उतरवली. तिच्या या जिद्दीमुळे ती एका सामाजिक संस्थेशी जोडली गेली. संस्थेसोबत काम करताना तिला आपल्या कर्तृत्वाची जाणीव होऊ लागली. मुलं शिक्षण घेत होती, पतीही मिळेल ते काम करून कुटुंबाला आधार देत होते. मात्र घरखर्च भागवताना मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पैसे कमी पडत होते. तरीही तीने हार मानली नाही. मोठ्या मुलाला शिक्षणासाठी अमेरिकेत पाठविण्यासाठी ती मिळेल ते काम करू लागली. कधी पर्यवेक्षकाचे काम, कधी बेकरी प्रशिक्षण घेऊन केक बनवण्याचे काम, तर कधी ई-रिक्षा चालवण्याचे… संस्थेच्या माध्यमातून तिला इनऑर्बिटसारख्या मॉलमध्ये पर्यावरणपूरक खताविषयी माहिती देण्याचे काम मिळाले. लोकांशी संवाद साधण्याची तिची ताकद तिथे उपयोगी पडली.

मुलगा परदेशात शिकत असताना तिच्या मनात मात्र स्वतःचे शिक्षण अपुरे राहिल्याची खंत होती.. सकाळी आठ वाजता घराबाहेर पडून रात्री दहा वाजता परत येणारी ती थकलेली असली, तरी तिच्या डोळ्यांत नेहमी स्वप्न असतं मुलांच्या उज्ज्वल भविष्यासोबत स्वतःचंही शिक्षण पूर्ण करण्याचे..

शिक्षणाच्या वाटेवर परतलेल्या या दुर्गांना आपल्या मदतीचा हात खूप मुलाची साथ देणारा ठरेल..

https://donate.prabhats.org

leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *