• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

तुफानातल्या पणत्या…५

Navdurga

शिक्षणाच्या वाटेवर आता थांबायचं नाय म्हणून परतलेल्या नवदुर्गा…

तिची चार भावंड दोन भाऊ आणि दोन बहिणी. मोठ्या भावाचे लग्न होऊन तो स्वतंत्र झाला, बहीणही लग्न करून तिच्या संसारात रमली…घरी राहिले ती आणि तिचा माझा धाकटा भाऊ.

आईच्या निधनानंतर घरातील सर्व जबाबदारी तिच्या खांद्यावर आली. वडील आजारी असल्याने त्यांची सेवा करताना तिचे शिक्षण अपुरेच राहिले. कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय बेताची होती. खत निर्मिती प्रकल्पावर काम करून थोडी आर्थिक स्थिती सावरतेय असं वाटत होतं, तेवढ्यातच धाकट्या भावाची पत्नी त्याला व मुलाला सोडून निघून गेली. त्यामुळे त्याच्या मुलाची जबाबदारीही तिच्यावर आली.
याच वेळेला तिला आता थांबायचं नाय बद्दल समजले… एक नवा आशेचा किरण दिसू लागला… सचिन आमडोस्कर यांच्या सारखे शिक्षक शिकवताना शिक्षणाचं खरं महत्त्व काय आहे हे समजायला लागलं. शिक्षण आयुष्य बदलू शकतं ही जाणीव झाली. म्हणूनच आज शिक्षण पूर्ण करून नव्याने उभं राहण्याच्या आशेनं ती यावर्षी दहावीची परीक्षा देणार आहे..

शिक्षणाच्या वाटेवर परतलेल्या या दुर्गांना आपला मदतीचा हात खूप मोलाची साथ देणारा ठरेल..

https://donate.prabhats.org