• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

तुफानातली 6 वी पणती..

Navdurga

अर्थात शिक्षणाच्या वाटेवर “आता थांबायचं नाही” म्हणून परतलेली सहावी नवदुर्गा..

वडील मोठ्या आजाराने गेले. आईलाही भयानक आजाराचा साथीदार बनावं लागलं. तीन भावंडांपैकी ती मोठी. आईला सर्वांचा सांभाळ शक्य न झाल्यामुळे दोन्ही मुलांना तिने हॉस्टेलवर पाठवलं. पण तिचं लग्न केवळ १४ व्या वर्षीच लावून दिलं.

पती नाका कामगार मिळेल ते काम करून कुटुंब सांभाळतो, आई कचरा वेचून आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते..
भाड्याच्या घरात तीचा संसार सुरू झाला. दोन मुलं, संसाराची जबाबदारी, आर्थिक पाठिंबा नाही. म्हणून ती स्वयंपाकाची कामं करू लागली..

सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत स्वयंपाक, मग मुलांच्या प्रेमापोटी घराकडे धाव. संध्याकाळी पाच ते सात पुन्हा स्वयंपाक, आणि रात्री नऊ ते अकरा भांडी घासायचं काम. एवढ्यातही आईची विचारपूस करणं ती विसरत नाही..!

शाळा अर्धवट राहिली, ही खंत मात्र तिच्या कायम मनात. कारण ती हुशार होती, अभ्यासात नेहमी पुढे होती. आता तीचं अपूर्ण स्वप्नं मुलांच्या शिक्षणातून पूर्ण करायची जिद्द तिच्या मनात आहे.

याच काळात तिला समजलं की संस्थेने दहावीला बाहेरून बसणाऱ्यांसाठी अभ्यासवर्ग सुरू केले आहेत. तिने तत्परतेने प्रवेश घेतला. तिची एक वर्गमैत्रीण मध्येच सोडून गेली, पण तिने मात्र हार मानली नाही. “कितीही संकटं आली तरी मी शिक्षण पूर्ण करणारच” असा विश्वास मधुकर वारभुवन सर यांच्यासारखे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये रुजवत आहेत..
यावर्षी ती दहावीची परीक्षा देणार आहे. शिक्षणाच्या वाटेवर परतलेल्या या दुर्गेला आपण दिलेला आधार, प्रोत्साहन आणि मदतीचा हात तिच्यासाठी नक्कीच मोठा आधार ठरेल..

अधिक माहितीसाठी प्रभात ट्रस्टला 9869432224 संपर्क करावा.