कार्यांजली
प्रेरणा सत्कर्माची.. आठवण अमर स्मृतींची..
आपले प्रियजन आज आपल्यात नाहीत परंतु त्यांनी दिलेली सत्कर्माची शिकवण आपल्यात खोलवर रुजलेली आहे.. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजातील वंचित घटकाला मदतीचा हात देऊन त्यांच्या अमर स्मृतींना उजाळा देऊयात..दहा हजार रुपये सहयोग निधी देऊन त्याच्या ठेवीतून प्राप्त होणाऱ्या रकमेतून प्रतिवर्ष एका कामगारासाठी आपल्या प्रियजनांच्या स्मृतिपित्यर्थ प्रभात द्वारे नाका कामगारांसाठी अन्नदान, वार्षिक आरोग्य तपासणी, चष्मा वितरण, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य असे विविध उपक्रम राबविले जातील.
प्रभातच्या या उपक्रमात सहयोग देऊन पितृपक्षात आपल्या प्रियजनांना कार्यांजली अर्पण करूयात..
ज्यांनी घडविले आपल्याला..वंदन करूया त्या पूर्वजांना..?
